राहुरी तालुक्यात ७५ सेवा संस्थांच्या निवडणुका होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:58+5:302021-02-06T04:36:58+5:30
राज्य सरकारने विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था निवडणुकांना ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगिती दिली होती. मात्र, आता कोरोना आजाराचा ...

राहुरी तालुक्यात ७५ सेवा संस्थांच्या निवडणुका होणार
राज्य सरकारने विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था निवडणुकांना ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगिती दिली होती. मात्र, आता कोरोना आजाराचा प्रादुर्भाव जवळपास कमी झाला आहे. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झालेल्या आहेत. निवडणूक प्राधिकरणाकडून पुढील आदेश येताच पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे.
....
...या सेवा सोसायट्यांच्या निवडणुका होणार
राहुरी तालुक्यातील कात्रड, गुंजाळे, वांबोरी, खडांबे बुद्रुक, खडांबे खुर्द, धामोरी खुर्द, कोंढवड, वरवंडी, बाभूळगाव, म्हैसगाव, चिखलठाण, दरडगाव थडी, तांभेरे, कनगर, गणेगाव, तांदुळनेर, वडनेर, कानडगाव, निंभेरे, तुळापूर, गुहा, सडे, देसवंडी, उंबरे, कुक्कडवेढे, चेडगाव, केंदळ बुद्रुक, केंदळ खुर्द, डिग्रस, शिलेगाव, मुसळवाडी, वाघाचा आखाडा, तांदुळवाडी, बारागाव नांदूर, टाकळीमियाँ, मालुंजे खुर्द, माहेगाव, ब्राम्हणगाव भांड, खुडसरगाव, शेनवडगाव, पाथरे खुर्द, कोपरे, तीळापूर, मांजरी, आरडगाव, मानोरी, सात्रळ नंबर एक, रामपूर, केसापूर, करजगाव, जातप, आंबी, त्र्यंबकपूर, कोल्हार खुर्द, दवणगाव,चांदेगाव, धानोरे, राहुरी फ्रुट गोवर्स, जोगेश्वरी आखाडा, गंगापूर, संक्रापूर, पिंपळगाव फूनगी, तमनर आखाडा, मल्हारवाडी, कोळेवाडी, चंडकापूर, मोकळ ओहोळ, मोरेवाडी, माळेवाडी डुकरेवाडी, ब्रम्हानंद महाराज खुडसरगाव, अंमळनेर, नारायण खुळे, वळण पिंपरी, कुरणवाडी, मोरवाडी टाकळीमिया, शनेश्वर उंबरे, गुरुदत्त केंदळ खुर्द, टाकळीमिया नंबर २, प्रेरणा गुहा सेंट्रल, वाल्मिकी वांबोरी आदी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.