शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव स्पर्धेतून बाहेर!
2
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
3
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
4
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
5
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
6
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
7
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
8
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
9
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
10
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
11
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
12
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
13
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
14
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
15
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
16
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
17
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
18
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
19
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
20
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत

सुजय विखेंचं नाव संग्राम जगतापांच्या वर; पाहा कसा ठरतो EVM वरचा क्रम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 17:36 IST

‘नावात काय आहे?’ असं जगविख्यात लेखक शेक्सपिअरने म्हटलेलं आहे. खरंच नावात काय असतं आणि त्याचे महत्त्व कधी, कुठे अधोरेखित होईल, याची अनुभूती सध्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना येत आहे.

चंद्रकांत शेळके

अहमदनगर : ‘नावात काय आहे?’ असं जगविख्यात लेखक शेक्सपिअरने म्हटलेलं आहे. खरंच नावात काय असतं आणि त्याचे महत्त्व कधी, कुठे अधोरेखित होईल, याची अनुभूती सध्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांना येत आहे.

सोमवारी अहमदनगर मतदारसंघ निवडणूक रिंगणातील उमेदवार अंतिम झाले आणि मतदानावेळी ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर असणारा उमेदवारांचा क्रम समोर आला. त्यात बसपाचे नामदेव वाकळे प्रथम, भाजपचे सुजय विखे दुसऱ्या तर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर राज्यस्तरीय पक्ष व शेवटी अपक्ष असा हा क्रम पुढे जातो. मुळात मतदान यंत्रावरील उमेदवारांचा क्रम ठरतो कसा, त्यात सर्वांत वर कोण, सर्वात खाली कोण अशी चर्चा सुरू झाली. निवडणूक शाखेकडे विचारणा केली असता, त्यांनी या नावांच्या क्रमाचे सूत्र ‘लोकमत’शी बोलताना विशद केले.केंद्रीय निवडणूक आयोगाने ६ फेब्रुवारी २००९ रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतदान यंत्रावरील उमेदवारांच्या नावाचा क्रम ठरविला गेलेला आहे.या प्रक्रियेत प्रथम पक्षांचा क्रम ठरवला जातो, त्यानंतर उमेदवारांच्या नावांचा विचार होतो. प्रथम मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर नोंदणी झालेला, मात्र मान्यता नसलेला पक्ष व शेवटी अपक्ष अशी ही यादी झाल्यानंतर मग उमेदवारांची नावे अल्फाबेटप्रमाणे घेतली जातात.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्या त्या राज्याची राजभाषा निवडणुकीचे माध्यम म्हणून वापरतात. महाराष्ट्रात सर्व मतदारसंघांत निवडणुकीचे कामकाज मराठीतच चालते. त्यामुळे ईव्हीएमवर उमेदवारांची नावेही मराठी वर्णमालेनुसार ठरवून हा क्रम अंतिम केला जातो.‘सु’.... नंतर ‘सं....’भाजपचे सुजय विखे व राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यातील अहमदनगर मतदारसंघाची लढत देशात लक्षवेधी ठरली आहे. दोन तुल्यबळ उमेदवारांत होणारी ही निवडणूक आपापल्या पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे संग्राम-सुजय यांच्यात कोण बाजी मारणार? अशा पैजाच मतदारांत सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मतदान यंत्रावर उमेदवारांच्या नावांचा क्रम लक्षात घेता येथे सुजय व संग्राम यापैकी कोणाचे नाव अगोदर येणार हा प्रश्न होता. या मतदारसंघात बसपा, भाजप व राष्ट्रवादी हे तीन राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांच्या उमेदवारांना वरची पसंती देण्यात आली आहे. यातही मराठी वर्णमालेनुसार बसपाचे नामदेव वाकळे प्रथम आहेत. त्यानंतर सुजय व संग्राम यांची नावे आहेत. दोघांचे ‘स’ हे वर्ण समान येतात. परंतु वर्णमालेनुसार उकार हा अनुस्वाराच्या आधी येतो. त्यामुळे ईव्हीएमवर ‘सु’जय हे नाव ‘सं’ग्राम यांच्या आधी आलेले आहे.

टॅग्स :ahmednagar-pcअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Votingमतदान