तनपुरे कारखान्याची निवडणूक १६ जूनला
By Admin | Updated: May 9, 2016 23:49 IST2016-05-09T23:23:28+5:302016-05-09T23:49:06+5:30
राहुरी : येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १६ जून रोजी होत आहे. आजपासून (१० मे) अर्ज विक्रीही सुरू होणार आहे.

तनपुरे कारखान्याची निवडणूक १६ जूनला
राहुरी : येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १६ जून रोजी होत आहे. आजपासून (१० मे) अर्ज विक्रीही सुरू होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून संगमनेरचे उपनिबंधक जे़ एस़ आहेर व राहुरीचे उपनिबंधक गोकूळ नागरे यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान, बहुरंगी लढतीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एकीकडे कर्जाच्या खाईत असणाऱ्या या कारखान्याला उर्जितावस्थेत आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत असताना निवडणूक जाहीर झाली आहे. थकित देणी देण्यासाठी कारखान्याची मालमत्ता विक्रीची निविदा दोनदा प्रसिद्ध होऊनही प्रतिसाद मिळालेला नाही. आता केवळ कारखान्याकडे असलेल्या शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्याच्या हेतूने निवडणुकीत उड्या पडण्याची शक्यता आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोमवारी कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १० ते १६ मे दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करणे, १७ मे रोजी सकाळी ११ वाजता अर्जांची छाननी, दि. १८ मे ते १ जून दरम्यान अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया व त्यानंतर १६ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ५ यादरम्यान मतदान होत आहे. दुसऱ्या दिवशी १७ जूनला मतमोजणी होईल. (तालुका प्रतिनिधी)