अध्यक्षपदी अशोक म्हसे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:29 IST2021-06-16T04:29:40+5:302021-06-16T04:29:40+5:30
लोणी : प्रवरा सहकरी बँकेच्या अध्यक्षपदी अशोक म्हसे, तर उपाध्यक्षपदी बापूसाहेब वडीतके यांची बिनविरोध निवड झाली. बँकेचे पदाधिकारी निवडण्यासाठी ...

अध्यक्षपदी अशोक म्हसे यांची निवड
लोणी : प्रवरा सहकरी बँकेच्या अध्यक्षपदी अशोक म्हसे, तर उपाध्यक्षपदी बापूसाहेब वडीतके यांची बिनविरोध निवड झाली. बँकेचे पदाधिकारी निवडण्यासाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. सहकरी संस्थाचे उपनिबंधक जितेंद्र शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी अशोक म्हसे यांच्या नावाची सूचना मावळते अध्यक्ष बाळासाहेब भवर यांनी मांडली. त्यास संचालक छगन पुलाटे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी बापूसाहेब वडीतके यांच्या नावाची सूचना माजी उपाध्यक्ष अशोक आसावा यांनी मांडली. त्यास संचालक प्रकाश शिरसाठ यांनी अनुमोदन दिले.
150621\img_20210615_185825.jpg
प्रवरा सहकरी बॅकेच्या अध्यक्षपदी अशोक म्हसे तर उपाध्यक्ष पदी बापुसाहेब वडीतके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आ.राधाकृष्ण विखे व माजी आ.अण्णासाहेब म्हस्के यांनी त्यांचा सत्कार केला.