दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृध्द महिला ठार

By Admin | Updated: August 9, 2014 23:34 IST2014-08-09T23:31:45+5:302014-08-09T23:34:17+5:30

श्रीगोंदा : लिंपणगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात रुख्मिणी सावळेराम हांडे (वय ६५) ही वयोवृद्ध महिला ठार झाली

Elderly women killed in the attack of robbers | दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृध्द महिला ठार

दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृध्द महिला ठार

श्रीगोंदा : लिंपणगाव येथे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात रुख्मिणी सावळेराम हांडे (वय ६५) ही वयोवृद्ध महिला ठार झाली आहे. दरोडेखोरांनी नाना रेवगे यांची मोटारसायकल पळवून नेली तर
किसन हांडे यांच्या घरातील कपडे चोरण्याचा प्रयत्न केला ही घटना शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
समजलेली अधिक माहिती अशी की, अज्ञात दरोडेखोरांनी सुरुवातीला नाना रेवगे यांची टमटम गाडी चोरण्याचा प्रयत्न केला, परंतु चावी हाती लागली नाही. त्यानंतर मोटारसायकल चोरली आणि किसन हांडे यांच्या घरातील कपडे चोरले. तेवढ्यात शेजारी राहणाऱ्या रुख्मिणी हांडे घराबाहेर आल्या असत्या त्यांचा व दरोडेखोरांचा समोरासमोर सामना झाला. मागचा पुढचा विचार न करता दरोडेखोरांनी रुख्मिणी हांडे
यांच्या डोक्यात टणक वस्तूने घाव घातला.
रुख्मिणी हांडे रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. दौंड येथील रुग्णालयात नेण्यापूर्वीच रुक्मिणी हांडे यांनी प्राण सोडले. याबाबतची फिर्याद संतोष हांडे यांनी दिली.
घटनास्थळास शनिवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अप्पर पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे, पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक शशिकांत पाटोळे, पोलीस निरीक्षक अशोकराव ढेकणे यांनी भेट दिली आणि तपासाची चक्रे फिरविली आहेत. श्वान पथकाने ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत दरोडेखोरांचा मार्ग दाखविला.
घटनास्थळाजवळ एक स्क्रू ड्रायव्हर , गजाचा तुकडा सापडला. दरोडेखोर मोटारसायकलवरून पसार झाले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Elderly women killed in the attack of robbers