दोन दिवसात आठ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:23 IST2021-02-24T04:23:26+5:302021-02-24T04:23:26+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात दोन दिवसात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. सोमवारी १७८, तर मंगळवारी ...

दोन दिवसात आठ जणांचा मृत्यू
अहमदनगर : जिल्ह्यात दोन दिवसात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. सोमवारी १७८, तर मंगळवारी १५९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या ८९९ इतकी आहे, अशी महिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या कोरोनाबाबतच्या माहितीमध्ये रविवारी (दि. २१) रोजी जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ११२१ इतकी दिली होती. ती संख्या सोमवारी (दि. २२) ११२४ इतकी झाली. म्हणजे सोमवारी ३ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २३) हीच संख्या ११२९ इतकी आहे. म्हणजे एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसात आठ जणांचा मृत्यू झाल्याने यंत्रणाही सतर्क झाली आहे.
मंगळवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ६३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८१ आणि अँटिजेन चाचणीत १५ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (६०), अकोले (२) , कर्जत (२), कोपरगाव (७), नगर ग्रामीण (२१), राहाता (७), राहुरी (१), संगमनेर (३४), शेवगाव (४), इतर जिल्हा (३), जामखेड (२), कर्जत (१), नेवासा (१), पारनेर (७), श्रीगोंदा (२), श्रीरामपूर (१), पाथर्डी (१) येथील रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात मंगळवारी १३७ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ हजार ७६९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९७.२९ टक्के इतके झाले आहे.
------------
बरे झालेली रुग्ण संख्या : ७२,७६९
उपचार सुरू असलेले रुग्ण : ८९९
मृत्यू : ११२९
एकूण रुग्ण संख्या : ७४७९७