जुन्या वादातून आठ जणांनी केला तलवारीने हल्ला; एकजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 15:07 IST2017-12-11T15:03:05+5:302017-12-11T15:07:40+5:30

जुन्या वादातून आठ जणांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ ही घटना घडली.

Eight people assaulted with old sword; One seriously injured | जुन्या वादातून आठ जणांनी केला तलवारीने हल्ला; एकजण गंभीर जखमी

जुन्या वादातून आठ जणांनी केला तलवारीने हल्ला; एकजण गंभीर जखमी

अहमदनगर : जुन्या वादातून आठ जणांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ ही घटना घडली.
या मारहाणीत जावेद कासम शेख (वय ३९, रा. आलमगिर, भिंगार) हे जखमी झाले असून त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोवश शेख, मतीन शेख, इम्रान शेख, अली शेख, जरीफ शेख, अंकुश भोरे, साजीद उर्फ शेख उर्फ बब्बू फिटर व हबीब पत्रावाला यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ डिसेंबर रोजी रात्री जावेद शेख व त्यांचा एक मित्र हे मोटारसायकलवरून कांदा मार्केटच्या दिशेने जात होते. त्यांना आयुर्वेद चौकात अडवून मारहाण करण्यात आली. यावेळी रिव्हॉलव्हरनेही मारहाण केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरदवडे या करत आहेत.

Web Title: Eight people assaulted with old sword; One seriously injured