नगरमध्ये जन्मले आठ पायांचे वासरु
By Admin | Updated: March 20, 2017 16:20 IST2017-03-20T16:18:28+5:302017-03-20T16:20:06+5:30
प्रगतशिल शेतकरी जयवंत शिंदे यांच्या संकरीत गाईने आठ पाय, दोन शेपट्या असलेल्या वासराला जन्म दिला आहे.

नगरमध्ये जन्मले आठ पायांचे वासरु
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 20 - नगर तालुक्यातील दहिगाव येथील प्रगतशिल शेतकरी जयवंत शिंदे यांच्या संकरीत गाईने आठ पाय, दोन शेपट्या असलेल्या वासराला जन्म दिला आहे. आठ पाय असल्यामुळे या गायीचे सिझर करावे लागले़ मात्र, सिझर वेळेत न झाल्यामुळे हे वासरु दगावले आहे.
रविवारी (दि.१९) सकाळी गाईला बाळंत वेण सुरू झाल्या़ तीन-चार तास होऊनही गाईचे वेण होत नव्हते. त्यामुळे त्यांचा मुलगा डॉ. अशोक शिंदे, स्थानिक डॉ. तुषार निमसे यांनी गायीला तपासले असता त्यांना गाईच्या पोटातील वासरास सहा पाय असल्याचे जाणवले.
वाळकी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. मुकुंद राजळे यांना बोलावण्यात आले़ त्यांनी सिझर करून वासरू बाहेर काढले़ या वासरास आठ पाय, दोन शेपट्या, एक मुंडके होते. गायीची प्रकृती सुस्थितीत असून, वासरु मात्र दगावले आहे़ डॉ. राजळे यांना डॉ. अशोक शिंदे, तुषार निमसे, शेखर ठाणगे, अतुल बोठे, व देठे यांनी सहकार्य केले.
अनवंशिक गुणसुत्रातील दोषामुळे असे होते़ अशा प्रकारे झालेले वासरु जगण्याची शक्यताच नसते, असे पशुधन विकास अधिकारी डॉ़. मुकुंद राजळे यांनी सांगितले़