आठही महामार्ग आठ पदरी होणार
By Admin | Updated: March 20, 2016 00:49 IST2016-03-20T00:41:29+5:302016-03-20T00:49:32+5:30
अहमदनगर : नगर शहरातून जाणारे आठही महामार्ग हे आठ पदरी होणार आहेत. त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास खात्याने निधीची तरतूद केली आहे.

आठही महामार्ग आठ पदरी होणार
अहमदनगर : नगर शहरातून जाणारे आठही महामार्ग हे आठ पदरी होणार आहेत. त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास खात्याने निधीची तरतूद केली आहे. रेल्वेमार्गावर आठ ठिकाणी नव्याने उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. यासोबतच शहरातील उड्डाणपुलही केंद्राच्या निधीतून होणार असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचारी सेवा संस्थेचे शनिवारी सकाळी खा. गांधी यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. निवृत्त अभियंता एन. डी. कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ही संस्था स्थापन केली आहे. या कार्यक्रमास आ. संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह बांधकाम खात्यातील अभियंता, कर्मचारी उपस्थित होते.
खा. गांधी म्हणाले, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजुर केली आहेत. त्यामुळेच नगर जिल्ह्यातील रस्ते आणि पुलाची कामे मार्गी लागत आहेत. (प्रतिनिधी)