मानोरीत सरपंच सोडून आठ ग्रामपंचायत सदस्यांनी दिले राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 15:20 IST2020-07-15T15:18:31+5:302020-07-15T15:20:23+5:30
राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांनी आपले राजीनामे सरपंच अब्बास शेख यांच्याकडे सुपूर्द केले.

मानोरीत सरपंच सोडून आठ ग्रामपंचायत सदस्यांनी दिले राजीनामे
राहुरी : तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांनी आपले राजीनामे सरपंच अब्बास शेख यांच्याकडे सुपूर्द केले.
मानोरी गावांमध्ये गाजत असलेल्या अतिक्रमणाच्या मुद्यावरून मंगळवारी (दि.१५ जुलै) शिवाजी थोरात, छाया पिले, शकुंतला चोथे, हिराबाई दुबे या सदस्यांनी राजीनामे दिले. दरम्यान एक दिवस अगोदर उपसरपंच दिलावर पठाण, सदस्य बापूसाहेब देवकाते, शकुंतला आढाव, शामराव आढाव यांनी राजीनामे दिले आहेत.
या राजीनामा देणाºया सदस्यांची संख्या आता आठवर गेली आहे. दरम्यान सरपंच अब्बास शेख यांचा राजीनामा पंचायत समितीकडे आला नव्हता.
सरपंच शेख यांनी सांगितले की, मी व सर्व सदस्यांनी गटविकास अधिका-यांची भेट घेतली आहे. त्यांनी संबंधित अतिक्रमण करणा-या ग्रामस्थांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे माझा राजीनामा थांबविला आहे.