माहीजळगावमध्ये पकडला साडे अठ्ठ्यांशी हजारांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST2020-12-25T04:17:46+5:302020-12-25T04:17:46+5:30
कर्जत : तालुक्यातील माहिजळगाव येथील गुरुकृपा पान सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकून ८८ हजार ५१ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ...

माहीजळगावमध्ये पकडला साडे अठ्ठ्यांशी हजारांचा गुटखा
कर्जत : तालुक्यातील माहिजळगाव येथील गुरुकृपा पान सेंटरमध्ये पोलिसांनी छापा टाकून ८८ हजार ५१ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच गुटखा विक्रेता लक्ष्मण झुंबर भिसे (रा. महिजळगाव, ता. कर्जत) यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुनील खैरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यात अवैद्य धंद्याविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी राजरोसपणे बंदी असलेल्या गुटख्याची विक्री चालू आहे. तालुक्यातील महिजळगाव येथील गुरुकृपा पान सेंटर येथे बंदी असलेल्या गुटख्याची विक्री चालू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यादव यांना मिळाली. त्यांनी तातडीने गुरुकृपा पान सेंटर येथे छापा टाकीत पान टपरी आणि घरी असा मिळून ८८ हजार ५१ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, उपनिरीक्षक अमरजित मोरे व भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर, गोवर्धन कदम, अमित बरडे, सुनील खैरे यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार प्रल्हाद लोखंडे करीत आहेत.
(फोटो - कर्जत तालुक्यातील माहीजळगांव येथे पान टपरीवर धाड टाकून कर्जत पोलिसांनी जप्त केलेला माल.