चितळीत आठ एकर ऊस खाक
By | Updated: December 6, 2020 04:21 IST2020-12-06T04:21:43+5:302020-12-06T04:21:43+5:30
तिसगाव : चितळी (ता. पाथर्डी) येथे शुक्रवारी चार शेतकऱ्यांचा तोडणीला आलेला आठ एकरातील ऊस आगीत भस्मसात झाला. या घटनेची ...

चितळीत आठ एकर ऊस खाक
तिसगाव : चितळी (ता. पाथर्डी) येथे शुक्रवारी चार शेतकऱ्यांचा तोडणीला आलेला आठ एकरातील ऊस आगीत भस्मसात झाला. या घटनेची माहिती मिळताच वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन वाहन अवधीतच पोहोचले. मात्र, पाणथळ क्षेत्रातील चिखलात रूतून बसले.
अग्निशमन वाहन बाहेर काढण्यासाठी जेसीबी यंत्राला पाचारण करावे लागले. त्यामुळे मदतीस विलंब झाला. सकाळी दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत हे अग्नीचे तांडव सुरू होते. त्यामुळे एकापाठोपाठ एक असे शेजारीच असलेल्या चार शेतकऱ्यांचा आठ एकरातील ऊस जळाला. विहिरीवरील विद्युत मोटार, स्टार्टर, केबल, पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचन संच असे शेतीपूुरक साहित्यही आगीत खाक झाले.
बाळासाहेब कोठुळे, विधिज्ञ काकासाहेब कोठुळे, अमोल कोठुळे, सुरेश कोठुळे आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले. वृद्धेश्वर कारखाना जळीत झालेला ऊसतोडणी करून नेणार आहे. मात्र, घटलेली प्रतवारी व वजनातील तूट यामुळे या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी झळ बसणार आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. कामगार तलाठी जयश्री धवणे जळीत क्षेत्राचा पंचनामा करणार आहेत.