कुकाण्यात विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 18:47 IST2018-06-16T18:47:36+5:302018-06-16T18:47:41+5:30
पतसंस्थेसमोर विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज दुपारी शेतकरी राजेंद्र गवळी यांनी कुकाणा गावातील श्री संत नारायणगिरी महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या समोर विष प्राशन केलं.

कुकाण्यात विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न
अहमदनगर : पतसंस्थेसमोर विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज दुपारी शेतकरी राजेंद्र गवळी यांनी कुकाणा गावातील श्री संत नारायणगिरी महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या समोर विष प्राशन केलं. जमावाने त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविले.
नेवासा तालुक्यातील येथील गवळी यांचे फसवणूक झाल्याचे म्हणणे आहे. गवळी पैशासाठी १० दिवसांपासून खेटा घालत होते. मात्र अखेर आज दुपारच्या सुमारास गवळी यांनी बँकेच्या समोरच विष प्राशन केलं.