कोरोना महामारीमुळे शैक्षणिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:25 IST2021-08-22T04:25:41+5:302021-08-22T04:25:41+5:30
तिसगाव : कोरोना महामारीमुळे देशासह जनसामान्यांची आर्थिक स्थिती खालावली. आप्तेष्ट व कुटुंबातील जिव्हाळ्याची माणसे आपण गमावली. अनेक कटू प्रसंग ...

कोरोना महामारीमुळे शैक्षणिक नुकसान
तिसगाव : कोरोना महामारीमुळे देशासह जनसामान्यांची आर्थिक स्थिती खालावली. आप्तेष्ट व कुटुंबातील जिव्हाळ्याची माणसे आपण गमावली. अनेक कटू प्रसंग ओढवले. महामारीने सार्वत्रिक दु:खासोबत मुलांचे शैक्षणिक नुकसानही झाले, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
तिसगाव (ता. पाथर्डी) येथे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. सरपंच काशिनाथ लवांडे अध्यक्षस्थानी होते. पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी, उपसरपंच इलियास शेख, प्राचार्य एम. बी. मरकड, प्रा. मुक्तार शेख, सिने निर्माते विक्रम ससाणे, ज्येष्ठ नेते माधवराव लोखंडे, युवा नेते भाऊसाहेब लवांडे, आदी उपस्थित होते. गर्भगिरी डोंगररांगांतील विविध गाव परिसरात मोबाईलला रेंज नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या अडचणी आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून शाळा लवकरच सुरू करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली पाहिजेत, असेही राजळे म्हणाल्या.
सादिया ताहेर शेख, अनिशा दीपक भापसे, सानिका संदीप थोरात, अंजली गणेश खोमणे, तेजस्वी राजेंद्र खंडागळे, नवाज शेख, आदींचा याप्रसंगी सन्मान करण्यात आला. यावेळी सुनील शिंगवी, रफिक शेख, दगडू तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य पद्माकर पाथरे, नाथा वाबळे, वहाब इनामदार, पापाभाई तांबोळी, दिलीप गांधी, महावीर छाजेड, आरिफ तांबोळी, नितीन लवांडे, लक्ष्मण गवळी, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सुनील लवांडे यांनी आभार मानले.