शैक्षणिकनगरी एकाच छताखाली

By Admin | Updated: May 29, 2014 00:28 IST2014-05-28T23:50:30+5:302014-05-29T00:28:58+5:30

लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन

Educational Cards Under One Roof | शैक्षणिकनगरी एकाच छताखाली

शैक्षणिकनगरी एकाच छताखाली

अहमदनगर: आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, सर्व शैक्षणिक संस्थेची माहिती घेण्यासाठी किती फिरावे लागणार, वर्षाला किती फि भरावी लागणार, अनुदान मिळेल काय, असे एक ना अनेक प्रश्न पालकांच्या मनात असतील. मात्र, आता आपल्या पाल्याच्या भावी करिअरची चिंता सोडविसाठी ‘लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर’ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने नामांकित शैक्षणिक संस्थेची इत्यंभूत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी दिशादर्शक ठरणारे हे प्रदर्शन म्हणजे शैक्षणिक कुंभमेळाच ठरणार आहे. तसेच व्यावसायिकांनाही हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचता येणार आहे. शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढकार घेणार्‍या ‘लोकमत समूहा’तर्फे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, विळद घाट प्रस्तुत यंदाही एस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ३० मे २०१४ ते १ जून २०१४ दरम्यान गायकवाड सांस्कृतिक भवन, बिग बाजार समोर, सावेडी रोड, अहमदनगर येथे हे भव्य शैक्षणिक प्रदर्शन भरणार आहे. पालक, पाल्यांच्या मनात शिक्षणाविषयीच्या शंका, कुशंका असतात. त्या प्रत्येक शंकांचे निराकरण या प्रदर्शनात होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ या प्रदर्शनात मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनिअरींग, आर्किटेक्टचरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटिरियर डिझाइनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंग पर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस,आयटीआय, हॉटेल मॅनेजमेंट, फॉरेन लॅग्वेज, पॉलिटेक्निकल, स्पोकन इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट या सर्व इन्स्टिट्यूट प्रदर्शनात सहभागी होणार आहे. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिनाच उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचणार आहे. व्यावसायिकांना व्यवसायवाढीसाठी हे प्रदर्शन म्हणजे सुवर्णसंधी ठरणार आहे. एकाच छताखाली हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत शैक्षणिक संस्थेची माहिती पोहोचविता येणार आहे. प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या संवाद साधून आपल्या उपक्रमाची माहिती देता येणार आहे. यानिमित्ताने नवा वर्ग आपल्या संस्थेशी जोडल्या जाणार आहे. मोजकेच स्टॉल शिल्लक असल्याने शैक्षणिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी आजच आपला स्टॉल बुक करावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२२९१३१७२ या नंबरवर संपर्क साधावा. १२ जिल्ह्यात प्रदर्शन लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर २०१४’ हे राज्यस्तरीय प्रदर्शन १२ जिल्ह्यांमध्ये भरविण्यात येणार आहे. यात औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूरचा समावेश आहे. भरपूर बक्षिसे लोकमत समूहातर्फे आयोजित लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर २०१४ या शैक्षणिक प्रदर्शनात भेट देणार्‍या प्रत्येकाला आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. याअंतर्गत गायकवाड सांस्कृतिक भवन, बिगबाजारसमोर, सावेडी रोड येथे भेट देणार्‍या भाग्यवंत विजेत्यांना दर दिवशी दर तासाला चांदीचे नाणे जिंकता येणार आहे. तसेच दर दिवशी होणार्‍या लकी ड्रॉमध्ये आकर्षक मोबाईलही जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोबतच इयत्ता १० वी/१२ वी मध्ये ९० टक्केंपेक्षा जास्त गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचाही येथे सत्कार करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९८५०२६४२०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Educational Cards Under One Roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.