माणूस घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST2021-02-05T06:41:15+5:302021-02-05T06:41:15+5:30
केडगाव : माणूस घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण होय. पूर्वीच्या काळात शिक्षणाची मक्तेदारी एका विशिष्ट वर्गाकडे होती. ही ...

माणूस घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण
केडगाव : माणूस घडविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण होय. पूर्वीच्या काळात शिक्षणाची मक्तेदारी एका विशिष्ट वर्गाकडे होती. ही शिक्षणाची ज्ञानगंगा समाजातील बहुजनांच्या दारापर्यंत पोहचविण्याचे काम ह.कृ. तथा बाळासाहेब काळे यांनी केले. त्यांच्या याच विचारांचा वारसा अविरतपणे चालविण्याचे काम अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था करत आहे, असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे यांनी केले.
नगर शहरातील न्यू आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज येथे आयोजित कै. ह.कृ. तथा बाळासाहेब काळे स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के होते.
यावेळी संस्थेच्या विश्वस्त अरुणा काळे डॉ. मेधा काळे, विश्वासराव काळे, प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बी.बी. सागडे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. ए.के. पंधरकर, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. डी.के. मोटे, सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. परीक्षक म्हणून प्रा. सतीश शिर्के व डॉ. आंबदास पिसाळ यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा कदम यांनी केले. प्रास्ताविक डॉ. ए.के. अंबाडे यांनी केले. डॉ. राजेंद्र साबळे, डॉ. नीलिमा विखे यांनी आभार मानले. डॉ. मीना साळे, प्रा. नीलेश लंगोटे, प्रा. निखिल गोयल, प्रा. मयूर रोहोकले, प्रा. नितीन काळे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावली.