केेंद्राकडून कोरोना लसीकरणासाठी मिळेना एडी सीरिंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST2021-09-14T04:25:28+5:302021-09-14T04:25:28+5:30

अहमदनगर : कोरोना लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या एडी सीरिंजचा तुटवडा निर्माण झाल्याने सध्या लसीकरणासाठी २ सीसी किंवा इतर सीरिंज (सुई) ...

Eddy syringes not available for corona vaccination from the center | केेंद्राकडून कोरोना लसीकरणासाठी मिळेना एडी सीरिंज

केेंद्राकडून कोरोना लसीकरणासाठी मिळेना एडी सीरिंज

अहमदनगर : कोरोना लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या एडी सीरिंजचा तुटवडा निर्माण झाल्याने सध्या लसीकरणासाठी २ सीसी किंवा इतर सीरिंज (सुई) वापरली जात आहे. केंद्र शासनाकडून होणारा हा पुरवठा गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बंद झाला आहे. त्यामुळे लसीकरणासाठी डोस घेताना कर्मचाऱ्यांना काळजी घ्यावी लागत आहे.

कोरोना लसीकरणासाठी एडी सीरिंजचा वापर केला जातो. एडी म्हणजे ॲटो डिसेबल. कोरोनाच्या लसीच्या कुपीतून ५ मिली द्रावण ओढल्यानंतर ही सीरिंज ऑटो लाॅक होते. म्हणजे सुईत सारखा डोस ओढला जातो. प्रत्येक वेळी कर्मचाऱ्यांना तो किती घेतला हे पाहण्याची गरज नाही. त्यातून लसीकरणही वेगाने होते. परंतु गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून एडी सीरिंजचा तुटवडा असल्याने केंद्र शासनाकडून या सीरिंजचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या २ सीसी किंवा इतर सीरिंज वापरण्याबाबत केंद्राने कळवले आहे. इतर सीरिंज वापरण्यात काही गैर नाही. परंतु यात एक अडचण अशी आहे की, द्रावण ओढताना कर्मचाऱ्यांना ते नीट पाहून ५ मिलीच घेतले आहे का, ते प्रत्येक वेळी काळजीपूर्वक पाहावे लागणार आहे. अन्यथा डोसचे प्रमाण कमी-अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एडी सीरिंजमध्ये ही अडचण नव्हती.

------------

काय आहे एडी सीरिंज?

एडी सीरिंज म्हणजे ‘ऑटो डिसेबल.’ कुपीतून ५ मिली द्रावण ओढल्यानंतर ही सुई आपोआपच लॉक होते. या सुईतून लस वाया जात नाही. याचा साठा उपलब्ध होत नसल्याने प्रशासन ‘२ सीसी’ सुईचा वापर करीत आहे.

-----------

काय आहे २ सीसी सीरिंज

कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सीरिंजचा पुरवठा कमी झाल्याने बालकांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणारी २ सीसी सीरिंज वापरण्यात येत आहे. या सीरिंजमध्ये द्रावण घेतल्यानंतर त्यातील एअर काढण्यासाठी काही द्रावण वाया जाते. त्यामुळे लसीचे वेस्टेज वाढण्याची शक्यता आहे. ही सुई काही जाडही असते.

-----------

जिल्ह्याला रोज किती लागतात सीरिंज?

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून लसीकरणाचा वेग वाढला आहे. गेल्या अकरा दिवसांत जिल्ह्यात साडेचार लाख डोस दिले गेले आहेत. सध्या लस उपलब्धतेनुसार रोज सरासरी २० ते ५० हजार डोस दिले जात आहेत. त्यामुळे जेवढे डोस तेवढ्या सीरिंज लागत आहेत.

--------------

केंद्राकडून सध्या एडी सीरिंज येत नसल्याने स्थानिक पातळीवरील इतर सीरिंज लसीकरणासाठी वापरल्या जात आहेत. या सूईंमधूनही व्यवस्थित लसीकरण सुरू आहे.

- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Eddy syringes not available for corona vaccination from the center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.