जवळे जिल्हा परिषद शाळेस ई-लर्निंगचे साहित्य भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:18 IST2021-04-03T04:18:36+5:302021-04-03T04:18:36+5:30

जवळे : येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेस व्हील्स इंडिया कंपनीकडून ई-लर्निंगचे ७५ हजार रुपये किमतीचा सेट भेट देण्यात ...

E-learning literature gift to nearby Zilla Parishad school | जवळे जिल्हा परिषद शाळेस ई-लर्निंगचे साहित्य भेट

जवळे जिल्हा परिषद शाळेस ई-लर्निंगचे साहित्य भेट

जवळे : येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेस व्हील्स इंडिया कंपनीकडून ई-लर्निंगचे ७५ हजार रुपये किमतीचा सेट भेट देण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी येथे असणाऱ्या व्हील्स इंडिया कंपनीचे मॅनेजर संजय भापकर, सुनील रामकृष्ण सालके यांनी यासाठी पुढाकार घेतला. भापकर म्हणाले, आमची कंपनी व्यवसायाबरोबरच सामाजिक हित जोपासते. जवळ्यातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शैक्षणिक अभ्यासक्रम आहेत. तो सर्व ई-लर्निंग संचमध्ये डाऊनलोड करून दिलेला आहे. शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांनाही त्याचा चांगला फायदा होणार आहे.

सूत्रसंचालन करताना संतोष साबळे यांनी केले. यावेळी सरपंच अनिता सुभाष आढाव, उपसरपंच गोरख शिवाजी पठारे, माजी पंचायत समिती सदस्य किसनराव रासकर, माजी सरपंच सुभाष भाऊसाहेब आढाव, सोमवंशी ॲग्रोचे शशिकांत सोमवंशी, प्रवीण भोस, प्रा. शितोळे, सेवा संस्था उपाध्यक्ष प्रदीप सोमवंशी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप सालके, उपाध्यक्ष शिरीष शेलार, श्रीधर पठारे, मुख्याध्यापक रमेश माळी, बाळासाहेब थोपटे, अंबरनाथ शिंदे, मनीषा क्षीरसागर, आशा रेपाळे, संगीता ठुबे आदी उपस्थित होते.

---

०२ जवळे

जवळेतील जिल्हा परिषद शाळेत ई-लर्निंग संचचा वापर कसा करावा, याबाबत माहिती देताना प्रा. शितोळे.

Web Title: E-learning literature gift to nearby Zilla Parishad school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.