‘ई-पीक पाहणी ॲप’ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST2021-09-06T04:25:53+5:302021-09-06T04:25:53+5:30

‘ई-पीक पाहणी ॲप’ची संगमनेर तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अंमलबजावणी करण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागातील ...

‘E-Crop Survey App’ useful for farmers | ‘ई-पीक पाहणी ॲप’ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

‘ई-पीक पाहणी ॲप’ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

‘ई-पीक पाहणी ॲप’ची संगमनेर तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अंमलबजावणी करण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना ॲपच्या वापराबाबत रविवारी (दि.५) माहिती व प्रशिक्षण देताना तहसीलदार निकम बोलत होते. नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, तलाठी पोमल तोरणे, कारखान्याचे सचिव किरण कानवडे, आदी यावेळी उपस्थित होते.

तहसीलदार निकम म्हणाले, शेतकऱ्यांच्या सातबारावर पिकांची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकांची नोंद झाल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ‘ई-पीक पाहणी ॲप’ उपयुक्त ठरणार आहे. हे ॲप वापरणे अतिशय सोपे आहे. शेतकऱ्यांना सर्वच प्रकारच्या पिकांची नाेंद ठेवता येणार आहे. नोंदणी करताना कुठलीही अडचण आल्यास त्या सोडविण्याच्या दृष्टीने महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपलब्ध आहेत. संगमनेर तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी १५ सष्टेंबरपर्यंत या ॲपद्वारे स्वत: आपल्या पिकांची नोंद करावी, असे आवाहनदेखील तहसीलदार निकम यांनी केले.

-----------

फोटो नेम : ०५पीक पाहणी ॲप, प्रशिक्षण, संगमनेर

ओळ : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना ॲपच्या वापराबाबत माहिती देताना तहसीलदार अमोल निकम.

Web Title: ‘E-Crop Survey App’ useful for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.