विहिरीत बुडून तरूणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 20:25 IST2017-09-07T20:25:48+5:302017-09-07T20:25:48+5:30

संगमनेर : मित्रांसोबत विहिरीत पोहायला गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारातील बिरेवाडी गावात घडली.

Dying of drowning in well in the well | विहिरीत बुडून तरूणाचा मृत्यू

विहिरीत बुडून तरूणाचा मृत्यू

संगमनेर : मित्रांसोबत विहिरीत पोहायला गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू झाला.
ही घटना गुरूवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारातील बिरेवाडी गावात घडली. वैभव कचरू फड (वय २२)असे मृत तरूणाचे नाव आहे. गावातील सार्वजनिक विहिरीत वैभव हा आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. जास्त पोहायला येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मयताचे चुलते संपत हरिभाऊ फड यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेहाचे श्वविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक आय. के. शेख तपास करीत आहेत.
 

Web Title: Dying of drowning in well in the well