मुलींसह आईचा विहिरीत बुडून मृत्यू
By Admin | Updated: June 8, 2014 00:35 IST2014-06-07T23:38:34+5:302014-06-08T00:35:06+5:30
अहमदनगर : पाणी शेंदण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा आईसह विहिरीत बुडून दुर्दैवी अंत झाला. नगर तालुक्यातील खोसपूरी येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

मुलींसह आईचा विहिरीत बुडून मृत्यू
अहमदनगर : पाणी शेंदण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा आईसह विहिरीत बुडून दुर्दैवी अंत झाला. नगर तालुक्यातील खोसपूरी येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.
गीता बाळू बनकर (वय ३५) आणि तिच्या दोन मुली पूजा (वय १०) व आरती (वय १) अशी मयत झालेल्या तिघांची नावे आहेत. गीता ही श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठणची होती. ती आठ दिवसांपूर्वीच आपल्या मामाकडे खोसपुरी येथे आली होती. शुक्रवारी गावात पाणी न आल्याने गिता लगतच्या शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी दोन मुलींना घेऊन गेली़ गीताचा पाय घसरुन ती विहिरीत पडली़ त्यापाठोपाठ दोन्ही मुलीही विहिरीत पडल्या़ घडना घडल्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीभोवती गर्दी केली़ त्यांना वाचविण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला़ या घटनेने खोसपुरी गावामध्ये शोककळा पसरली आहे़
या प्रकरणी पोलीस पाटील अंबादास देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम.आय.डी. सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)