नाशिकची दुर्गा जाधव मिस महाराष्ट्र
By Admin | Updated: August 2, 2024 10:35 IST2014-05-21T00:03:06+5:302024-08-02T10:35:04+5:30
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डिंग संघटनेच्या वतीने आयोजित बॉडीबिल्डिंग स्पर्धेत मिस महाराष्ट्रचा किताब नाशिकच्या दुर्गा भागवतने तर महाराष्ट्र श्रीचा किताब पिंपरीच्या महेंद्र पगडेने पटकावला.
नाशिकची दुर्गा जाधव मिस महाराष्ट्र
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डिंग संघटनेच्या वतीने आयोजित बॉडीबिल्डिंग स्पर्धेत मिस महाराष्ट्रचा किताब नाशिकच्या दुर्गा भागवतने तर महाराष्ट्र श्रीचा किताब पिंपरीच्या महेंद्र पगडेने पटकावला. नगरचा इम्तियाज शेख सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, सत्यजीत तांबे, अभियंता रोहिदास सातपुते आदींच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी राज्य बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे डॉ. संजय मोरे, राज्य पंच प्राचार्य जयंत गिते, मधुकर गायकवाड, स्नेहा खिस्ती, विश्वासराव मुर्तडक, आयोजक गणेश गुंजाळ, माजी भारत श्री शशिकांत खिस्ती आदी उपस्थित होते. महिला : १५० सेमीवरील स्नेहल कोरेगावकर द्वितीय, १५० सेमी खालील प्रथम - पूजा पाटील, द्वितीय पूनम सुतार, तृतीय - सिद्धी शिंदे (सर्व कोल्हापूर). स्पर्धेत राज्यातील २५० खेळाडू सहभागी झाले होते. (क्रीडा प्रतिनिधी)