डंपरच्या धडकेत महिला ठार, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 18:20 IST2019-02-17T18:20:08+5:302019-02-17T18:20:58+5:30
डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक महिला ठार तर दोन जण जखमी झाले.

डंपरच्या धडकेत महिला ठार, दोघे जखमी
कर्जत : डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक महिला ठार तर दोन जण जखमी झाले.
कर्जत शहरातील अक्काबाई चौकामध्ये आज सकाळी आठ वाजता दुचाकीला (एम.एच.- ४३, डब्ल्यू- ८५४८) टिपर (एम.एच.- १९, झेड- ४९२७) ने धडक दिल्याने सिंधूबाई बबन उर्फ ज्ञानदेव चौरे (वय ४० वर्षे) ठार झाल्या. बबन उर्फ ज्ञानदेव मल्हारी चौर आणि सरस्वती चद्रभान उबाळे हे जखमी झाले आहेत.
विक्रम नवनाथ धांडे यानी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सकाळी आठ वाजता कर्जत ते राशिन जाणा-या रस्त्यावर अक्काबाईनगर चौकामध्ये ज्ञानदेव उर्फ बबन चौरे हे त्यांची मोटारसायकलवर करमाळा रस्त्याने येवून राशिनकडे वळत होते. यावेळी कर्जतकडून करमाळाकडे जाणारा टिपरने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या प्रकरणी पोलीसांनी चालक हरीभाउ बन्सी शेळके यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल केला आला आहे.