संवत्सर ग्रामस्थांनी अडविले समृद्धी महामार्गाचे डम्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:03+5:302021-02-05T06:40:03+5:30
कोपरगाव : तालुक्यातील संवत्सर शिवारात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या भरावासाठी मातीची डम्परमधून वाहतुक होत आहे. या ...

संवत्सर ग्रामस्थांनी अडविले समृद्धी महामार्गाचे डम्पर
कोपरगाव : तालुक्यातील संवत्सर शिवारात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाच्या भरावासाठी मातीची डम्परमधून वाहतुक होत आहे. या अवजड वाहतुकीमुळे गावातील रस्ते उखडले असून, धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच डम्परचालक भरधाव वाहने चालवितात. त्यामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनादेखील धोका आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य विवेक परजणे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि.३०) हे डम्पर अडविले.
समृद्धीची ठेकेदार असलेल्या गायत्री कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यावर ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन दिले. निवेदनात म्हटले, समृद्धी महामार्गाच्या कामाच्या वाहतुकीमुळे गावातील डांबरी रस्त्याचे अतोनात नुकसान झालेले आहे. तसेच आपल्या कंपनीचे डम्पर या रस्त्याने वाहतूक करतात. रस्त्याच्या लगतच शाळा आहेत. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक बाब आहे. त्यामुळे आमचे रस्ते दुरुस्त करून मिळावे. तसेच जोपर्यंत रस्ते दुरुस्त होत नाही, तोपर्यंत वाहतूक होत असलेल्या रस्त्यावर सकाळ-संध्याकाळ पाणी मारावे. तसेच ही वाहतूक रात्रीच्या वेळी करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विवेक परजणे, कोल्हे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे, ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे, पांडुरंग शिंदे, पांडुरंग भोसले, दिनेश दिंडे, चंद्रकांत लोखंडे, राजेंद्र सोनवणे, योगेश गायकवाड, मच्छिंद्र भोकरे, धीरज देवतरसे, रमेश भामरे, मधुकर शेटे, मतीन तांबोळी, गणेश साबळे, सुरेश साबळे, बापूसाहेब बाराहाते, लक्ष्मण परजणे, अनिल आचारी उपस्थित होते.
...........
गावातून होणारी अवजड वाहतूक ही शाळकरी मुलांसाठी, ग्रामस्थांसाठी, व्यावसायिकांसाठी खूप त्रासदायक ठरत आहे. सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच गावातून जाणा-या डांबरी रस्त्याची वाट लागली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी समृद्धीच्या अधिकाऱ्याशी चर्चा झाली आहे. त्यानुसार, येत्या चार-पाच दिवसांत संयुक्त बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येणार आहे.
विवेक परजणे, ग्रामपंचायत सदस्य, संवत्सर
...................
फोटो३०- समृद्धी निवेदन- कोपरगाव
300121\img_20210130_174820-01.jpeg
संवत्सर येथे समृद्धी महामार्गाची होणारी अवजड वाहतुक संदर्भात कायमचा तोडगा काढावा यासाठी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी विवेक परजणे,मधुकर शेटे,चंद्रकांत लोखंडे.