शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

‘साकळाई’साठी सोमवारपासून मुंबईत धरणे : बैठकीत शेतकऱ्यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 17:32 IST

श्रीगोंदा व नगर तालुक्यांतील तब्बल ३५ गावांच्या पाण्याबाबत आस्थेचा विषय असलेल्या साकळाई योजनेच्या मंजुरीसाठी मुंबईत आझाद मैदानात सोमवारपासून (दि.२४) धरणे आंदोलन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला.

श्रीगोंदा/केडगाव : श्रीगोंदा व नगर तालुक्यांतील तब्बल ३५ गावांच्या पाण्याबाबत आस्थेचा विषय असलेल्या साकळाई योजनेच्या मंजुरीसाठी मुंबईत आझाद मैदानात सोमवारपासून (दि.२४) धरणे आंदोलन करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगणमधील बोरूडे मळा येथील मारूती मंदिरात शेतकऱ्यांची बैठक झाली.आश्वासने देऊनही पुढे काहीच कारवाई होत नसल्याने मुंबई येथे अधिवेशनाच्या दरम्यान येत्या २४ जून रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने योजनेची अधिसुचना काढली नाही तर ९ आॅगस्टपासून बेमुदत उपोषणाचे निवेदन धरणे आंदोलनाच्या दिवशी शासनाला देण्यात येणार आहे. प्रत्येक गावातून लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी विक्रम शेळके, धनंजय शिंदे, शिवाजी वाघमारे, शिवा म्हस्के, युवराज पडोळकर, हर्षवर्धन शेळके, जयसिंग खेंडके, दादासाहेब जगताप, महेश शिंदे, गोवर्धन कार्ले, राजेंद्र लोखंडे, कारभारी बोरूडे, शिवाजी शेलार, बापूराव ढवळे, डॉ. बापू नलगे, अक्षय धोंडे, संतोष लाटे, राजेंद्र बोरूडे, यशवंत लोखंडे, दिलीप शेळके, नवनाथ पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावे आणि नगर तालुक्यातील हिवरे झरे, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, बाबुर्डी बेंद, वाळकी, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुई, गुंडेगाव, वडगाव, तांदळी, देऊळगाव, गुणवडी, राळेगण, अंबीलवाडी आदी १७ गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सन १९९८ पासून साकळाई योजनेचा विषय चर्चेत आला आहे. तेव्हा युती सरकारच्या काळात या योजनेला तात्विक मंजुरी मिळाली. अनेकांनी याच योजनेच्या मुद्यावर विधानसभा निवडणुका लढवल्या. केवळ निवडणुकांपुरताच हा विषय चर्चेत राहिला. योजनेला प्रशासकीय पातळीवर मंजुरी मिळालीच नाही.काही महिन्यापूर्वी शेतकºयांनी राजकारण विरहीत समिती तयार करून पुन्हा या योजनेबाबत जनजागृती सुरू केली. त्यास सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा मिळाला. अभिनेत्री दिपाली सय्यद, खासदार डॉ. सुजय विखे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार शिवाजी कर्डिले व आमदार राहुल जगताप यांनी मुख्यमंत्र्यांची वेगवेगळी भेट घेऊन लक्ष वेधले. या योजनेमुळे दुष्काळी गावांचा चेहरामोहरा बदलेल. या योजनेमुळे जवळपास १२० पाझर तलाव आणि १०० कोल्हापुरी बंधारे भरले जातील. त्यामुळे १८ हजार ५०० हेक्टर क्षेत्र बागायती होणार आहे. यासाठी जवळपास ८०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.काय आहे साकळाई योजना..कुकडी प्रकल्पाचे पावसाळ्यात वाया जाणारे अतिरिक्त पाणी विसापूर धरणातून बंद पाईपने उचलून ११ कि. मी. अंतरावरील साकळाई डोंगरावर नेण्यात येणार आहे. दोन मोठे डिलीव्हरी चेंबर उभारून त्यामधून पुन्हा बंद पाईपलाईनमधून नैसर्गिक उताराने हे पाणी नगर तालुक्याच्या बाजूला ११ कि. मी.च्या अंतरावरील सुमारे १७ गावांना आणि श्रीगोंदा तालुक्यातील १८ गावांना पोहचविले जाणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखे