शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

एकाकीपणामुळे तरुणांना मोबाईलवर पब्जीचे वेड : राजरत्न खिल्लारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 13:31 IST

पब्जी गेमच्या आहारी जाऊन श्रीरामपूरमध्ये एका उच्चशिक्षित तरुणाने डोक्यात गोळ््या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली.

भरत मोहोळकरअहमदनगर : पब्जी गेमच्या आहारी जाऊन श्रीरामपूरमध्ये एका उच्चशिक्षित तरुणाने डोक्यात गोळ््या झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. पब्जीच्या आहारी जाऊन आत्महत्या करणारा जिल्ह्यातील तो दुसरा बळी ठरला आहे. तर अनेक मुले पब्जीच्या वेड्यापायी आई-वडिलांपासून दुरावत आहेत. या गेमच्या आहारी जाण्यापासून तरुणांना कसे परावृत्त करता येईल, याबाबत न्यू आर्टस् महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातील समुपदेशक प्रा. राजरत्न खिल्लारे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद.प्रश्न : पब्जी या गेमचे व्यसन नेमके कसे लागते?उत्तर : नात्यात विसंवाद निर्माण झाल्यानंतर तो एकाकीपणा घालवण्यासाठी मुले हा गेम खेळायला सुरूवात करतात. या गेमध्ये अनेक टप्पे आहेत. त्यात प्रत्येक टप्पा पार करण्यासाठी तरूण प्रयत्न करतात. मग जर एखाद्या टप्प्यावर अपयश आले तर तो टप्पा पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा प्रयत्न करतात. या यशापयशाच्या खेळात त्यांच्या पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याने या गेमचे सवयीत व सवयींचे रूपांतर व्यसनात होते.प्रश्न : या गेमचा तरूणांवर काय परिणाम होतो?उत्तर : या गेममुळे तरूणांचा वेळ वाया जातो. तसेच या गेमचा तरूणांच्या मनावर भयंकर परिणाम होतो. यामध्ये पब्जीचे टप्पे पार झाले नाहीत तर मनावर ताण येतो.यामुळे नैराश्यता येते. त्यामुळे ते आणखी जास्त वेळ गेम खेळतात. त्यामुळे डोळे व डोके दुखण्याची शक्यता असते. या गेमची सवय लागली तर झोप व जेवणावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मुलांचा स्वभाव चिडचिडा होतो. या सगळ्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो.प्रश्न : या विळख्यातून सोडवण्यासाठी काही ठोस उपाय?उत्तर : तरूण या व्यसनात किती अडकला आहे ते तपासून त्याच्या समुपदेशनातून त्याला विळख्यातून बाहेर काढता येईल. पालकांनीही मुलांसोबत सुसंवाद ठेवावा. तरूणांमध्ये तंत्रज्ञानाबद्दल सकारात्मक भावना जागवावी. गेम खेळण्यापेक्षा मैदानी खेळ, चित्रपट पाहणे, पुस्तक वाचणे, यांसारख्या विशिष्ट कामात मन गुंतवले तर हे व्यसन सोडवायला मदत होईल.प्रश्न : पब्जी गेमकडे तरूण का वळतो आहे?उत्तर : कुटुंबात निर्माण होणारा विसंवाद, तरूण तरूणींमधील ब्रेकअपचे वाढते प्रमाण, त्यातून निर्माण होणारा एकाकीपणा, त्यातून येणारे नैराश्य यामुळे तरुण पब्जीसारख्या गेमकडे वळला आहे. आर्थिक चणचण हे एक कारण आहे.तरुणांचा पालकांशी विसंवाद आहे. बेरोजगारी, अपयश आणि कमी पैशात नेट पॅक ही पब्जीकडे ओढली जाण्याची कारणे आहेत. -राजरत्न खिल्लारे

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर