व्यायामाअभावी मधुमेहाचे रुग्ण वाढले

By Admin | Updated: March 13, 2016 23:53 IST2016-03-13T23:48:27+5:302016-03-13T23:53:44+5:30

अहमदनगर : मानसिक ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, गोड खाण्याचा अतिरेक यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजार न होण्यासाठी काळजी आवश्यक आहे.

Due to lack of exercise, patients with diabetes increased | व्यायामाअभावी मधुमेहाचे रुग्ण वाढले

व्यायामाअभावी मधुमेहाचे रुग्ण वाढले

अहमदनगर : मानसिक ताण-तणाव, व्यायामाचा अभाव, गोड खाण्याचा अतिरेक यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजार न होण्यासाठी काळजी आवश्यक आहे. वेदनारहित आजार असल्याने तो कळायच्या आतच माणसाचा घात करतो, असे प्रतिपादन मधुमेह तज्ज्ञ डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी केले.
मधुमेहाचा आजार टाळण्यासाठी नगर येथील स्टार जनरल केअर अ‍ॅण्ड आयसीयू युनितटर्फे मधुमेह आजार जागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत रविवारी सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात व्याख्यान आणि तपासणी शिबिर झाले. त्यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमास डॉ. रावसाहेब अनभुले, डॉ. रणजित सत्रे, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. श्रावणी कवडे, अपर्णा चव्हाण यांची उपस्थिती होती.
मधुमेहाबाबत मार्गदर्शन करताना डॉ. बहुरुपी म्हणाले, मधुमेहाकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णाला एखादा अवयव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार सर्वात वाईट आजार आहे. युवा पिढीत आहाराचे अज्ञान आणि व्यायामाचा अभाव ही दोन कारणे हा आजार वाढण्यामागे आहेत. उपाशीपोटी १२६ च्या पुढे आणि जेवल्यानंतर २०० पेक्षा जास्त रक्तामध्ये साखर असेल तर मधुमेह झाला, असे समजावे. मधुमेहामुळे पहिल्यांदा डोळे खराब होतात आणि ते करोडो रुपये खर्च केले तरी बरे होत नाहीत. लघवी जास्त होेणे, जळजळ, जंतुसंसर्ग, अस्वस्थता, वजन कमी होणे, सतत खावेसे वाटणे आदी मधुमेहाची लक्षणे आहेत. यावेळी त्यांनी मधुमेहाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, आहार आणि मधुमेह झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. अपर्णा चव्हाण म्हणाल्या, मानसिक शांतीसाठी व्यायाम करावा. खाण्यावर, कामावर प्रत्येकाने मर्यादा घातल्यास ताण कमी होईल. यावेळी स्लाईड शोद्वारे मधुमेहाची तीव्रता लक्षात आणून दिली. शहरात लवकरच मधुमेह क्लब स्थापन करण्यात येणार असल्याचे डॉ. रणजित सत्रे यांनी सांगितले. या कार्यक्रमास शहरातील नागरिक उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Due to lack of exercise, patients with diabetes increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.