सलग सुट्ट्यांमुळे बँकांमध्ये उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 17:05 IST2017-10-03T17:05:45+5:302017-10-03T17:05:54+5:30
भंडारदरा : पर्यटनस्थळ असलेल्या भंडारदरा (ता. अकोले) परिसरात शेंडी येथे असलेल्या दोन बँकांमध्ये गेल्या तीन दिवसांमधील सलग सुट्ट्यांमुळे मंगळवारी ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली होती.

सलग सुट्ट्यांमुळे बँकांमध्ये उसळली गर्दी
भंडारदरा : पर्यटनस्थळ असलेल्या भंडारदरा (ता. अकोले) परिसरात शेंडी येथे असलेल्या दोन बँकांमध्ये गेल्या तीन दिवसांमधील सलग सुट्ट्यांमुळे मंगळवारी ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली होती.
शेंडी येथे अहमदनगर जिल्हा सहकारी बँक व सेंट्रल बँक या दोनच बँकेच्या शाखा आहेत. परिसरातील अनेक गावांमधून शेतकरी, कामगार वर्ग, शिक्षक या बँक शाखांमध्ये व्यवहारासाठी येतात. तसेच शालेय विद्यार्थी आपल्या पालकांना घेऊन खाते उघडण्यासाठी येतात. पण सलग तीन दिवस बँकांना सुट्ट्या आल्यामुळे मंगळवारी तीन दिवसांनंतर बँकेत एकच गर्दी उसळली होती. गर्दी उसळल्यामुळे बँकेत ग्राहकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. गर्दीमुळे बराच वेळ रांगांमध्ये उभे राहावे लागल्यामुळे काही जणांना निराश होऊन परत घरी जावे लागले.
भंडारदरा येथे एकच राष्ट्रीयकृत बँक आहे. अनेकांची खाती या बँकेत आहेत. शेतकरी, पेन्शनधारक, नोकरवर्ग, शालेय विद्यार्थी यांची एकच गर्दी झाली होती. त्यात आणखी भर म्हणजे आधार लिंक करण्यासाठी जास्त गर्दी होती. नेटवर्कमुळे आधार लिंकिंग करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. २० ते २२ किलोमीटरहून येणाºयांना दिवसभर रांगेत उभे राहावे लागत होते. नेटवर्कच्या संथगतीमुळे सर्वच अडचणी येत आहेत.