मुळाच्या पुरामुळे जलवाहिनी फुटली
By Admin | Updated: October 17, 2016 01:02 IST2016-10-17T00:37:15+5:302016-10-17T01:02:16+5:30
राहुरी : मुळा नदीचे पात्र बदलल्याने जलवाहिनी फुटून १० दिवसांपासून १६ गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित झाला आहे़ त्यामुळे ६५ हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़

मुळाच्या पुरामुळे जलवाहिनी फुटली
राहुरी : मुळा नदीचे पात्र बदलल्याने जलवाहिनी फुटून १० दिवसांपासून १६ गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित झाला आहे़ त्यामुळे ६५ हजार लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़
मुळा नदीला आलेल्या पुरामुळे नांदूर रस्त्यालगत असलेले बेट १०० फूट कापले आहे़ नदीपात्र बदलल्याने माती वाहून गेली़ त्यामुळे जलवाहिन्या उघड्या पडल्या़ लोखंडी व सिमेंटचे जॉर्इंट त्यामुळे लिकेज झाले आहेत़ बारागाव नांदूर पाणी पुरवठा योजनेद्वारे १६ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो, अशी माहिती योजनेचे अध्यक्ष शिवाजीराव गाडे यांनी दिली़ बारागाव नांदूर, डिग्रस, राहुरी खुर्द, देसवंडी, तमनर आखाडा, आरडगाव, तांदूळवाडी, कें दळ खुर्द, केंदळ बुद्रुक, मानोरी, वळण मांजरी, चंडकापूर, पिंप्री या गावातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ सायकल, मोटारसायकल व चारचाकी वाहनांद्वारे मिळेल तेथून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे़ वाघाचा आखाडा, स्टेशन आदी भागातील लोक पाणी आणण्यासाठी राहुरीला येत आहेत़
पाणी पुरवठा योजना बंद असल्याने ग्रामपंचायती व गावकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे़ राहुरी खुर्द येथे सात दिवसांपूर्वी महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला होता़ जलवाहिन्या दुरूस्तीचे काम पाणी ओसरू लागल्याने हाती घेण्यात आले आहे़
(तालुका प्रतिनिधी)