पाथर्डी तालुक्यातील दोघांचा शेततळ््यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 19:02 IST2019-05-12T19:01:32+5:302019-05-12T19:02:57+5:30
पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथील दोन तरुणांचा शेततळ््यात बुडून मृत्यू झाला.

पाथर्डी तालुक्यातील दोघांचा शेततळ््यात बुडून मृत्यू
पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथील दोन तरुणांचा शेततळ््यात बुडून मृत्यू झाला.
गणेश राजेंद्र वाढेंकर (वय 17) व श्रीकृष्ण सयाजी मतकर (वय 14) असे मृत झालेल्या तरुणांची नावे आहे. गणेश वांढेकर हा नुकताच अकरावीची परीक्षा पास होऊन बारावीच्या शिकवणीसाठी तिसगाव येथे जात होता. तर श्रीकृष्ण सयाजी मतकर हा नववीमध्ये शिक्षण घेत होता. सकाळी साडेअकरा वाजता गणेश व श्रीकृष्ण हे दोघेही शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. परंतु श्रीकृष्ण यास पोहता पोहता येत नसल्याने त्याने पोहताना गणेशला मिठी मारली व दोघेही बुडून मृत्युमुखी पडले.