शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य व्यावसायिकांना दुष्काळाचा फटका

By admin | Updated: March 17, 2016 23:39 IST

अहमदनगर : दुष्काळामुळे तलाव कोरडेपडले आहेत़ तलावात पाणी न राहिल्याने मत्स्य व्यवसायावर गदा आली आहे़ त्यामुळे मत्स्य व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे़

अहमदनगर : दुष्काळामुळे तलाव कोरडेपडले आहेत़ तलावात पाणी न राहिल्याने मत्स्य व्यवसायावर गदा आली आहे़ त्यामुळे मत्स्य व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे़ जिल्ह्यात मत्स्य व्यावसायिकांचे मोठे जाळे आहे़ मत्स्य व्यावसायिकांच्या ७८ सहकारी संस्था स्थापन झाल्या आहेत़ या संस्थांमार्फत तलावातील मासेमारीचा व्यवसाय चालतो़ मात्र गेल्या तीन वर्षांपासून शेतीप्रमाणेच हा व्यवसायही अडचणीत आला आहे़ पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील ६८ तलावांत मत्स्य व्यवसाय करण्याचे हक्क मत्स्य विभागास दिले आहेत़ त्यापैकी २४ तलावांत पाणी आले नाही़ त्यामुळे या तलावांची विक्री झाली नाही़ सहकारी संस्थांनीही त्यासाठी निविदा दाखल केल्या नाहीत़ मत्स्य व्यवसाय सुरू असलेल्या ४४ पैकी २० तलाव देखील चालू महिन्यांत कोरडे पडले आहेत़ त्यामुळे तेथील व्यवसायही बंद झाला असून, अवघ्या २४ तलावांत मत्स्य व्यवसाय सुरू आहे़ पाण्याअभावी तलाव भरले नाहीत़ त्याचा परिणाम मत्स्य व्यवसायावरदेखील झाला असून, या व्यावसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे़ जिल्ह्यातील प्रमुख मुळानगर, घोड, सीना आणि खैरी या प्रमुख धरणाचे हक्कदेखील आहेत़ मुळा धरणात मत्स्य व्यवसाय सुरू आहे़ उर्वरित धरणांतील मत्स्य व्यवसायाला दुष्काळाचा फटका बसला आहे़ त्यामुळे सहकारी संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या असून, त्यांच्या हाताला काम मिळाले नाही़ हा व्यवसाय करणाऱ्यांच्या हाताला काम राहिले नाही़ त्यांच्यावर स्थलांतर करण्याची वेळ ओढावली आहे़(प्रतिनिधी)शेततळ्यांचा पर्यायदुष्काळावर मात करण्यासाठी जिल्ह्यात दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत़ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोठे शेततळे बांधण्यात येत आहेत. पावसाळ्यात त्यात पाणी साचेल, अशी अपेक्षा आहे़ त्यामुळे मध्यम तलावांबरोबरच मत्स्य व्यवसायासाठी शेततळ्यांचा पर्याय भविष्यात उपलब्ध होईल़ त्यादृष्टीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन जनजागृती केली जाणार आहे़ शेतकरीही हा व्यवसाय करू शकणार आहेत़ शेतीला जोड व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसाय समोर येणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगितले़