शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

गर्दीमुळे शिर्डीतील टाईम दर्शन व्यवस्था बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 11:09 IST

टाईम दर्शनामुळे होणारे भाविकांचे हाल पाहून काही संतप्त ग्रामस्थांनी टाईम दर्शन व्यवस्था बंद केली. गर्दीमुळे कोलमडलेली व्यवस्था व ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून प्रशासनाने सहमती दर्शवत व्यवस्था काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देगर्दीमुळे कोलमडलेली व्यवस्था व ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून प्रशासनाने सहमती दर्शवत व्यवस्था काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.टाईम दर्शनच्या पासेससाठी भाविकांना मोठमोठ्या रांगांचा सामना करावा लागला. श्रीराम पार्किंग व साईउद्यानमधील केंद्रावर गर्दी उसळली. यात वृद्ध, महिला, लहान मुले, अपंगांचे हाल झाले. भाविकांचे होणारे हाल पाहून त्यांनी गर्दी कमी होईपर्यंत टाईम दर्शन सुविधा बंद करून थेट भाविकांना दर्शनरांगेत जाण्याचे आवाहन केले. पासेसची कटकट कमी झाल्याने भाविक आनंदून गेले.

शिर्डी : टाईम दर्शनामुळे होणारे भाविकांचे हाल पाहून काही संतप्त ग्रामस्थांनी टाईम दर्शन व्यवस्था बंद केली. गर्दीमुळे कोलमडलेली व्यवस्था व ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून प्रशासनाने सहमती दर्शवत व्यवस्था काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.रविवारी गर्दीमुळे दर्शन रांगेत लागण्यापूर्वी टाईम दर्शनच्या पासेससाठी भाविकांना मोठमोठ्या रांगांचा सामना करावा लागला. श्रीराम पार्किंग व साईउद्यानमधील केंद्रावर गर्दी उसळली. यात वृद्ध, महिला, लहान मुले, अपंगांचे हाल झाले. याबाबत माहिती मिळताच नगरसेवक अभय शेळके, अशोक गोंदकर, प्रमोद गोंदकर, सुधाकर शिंदे आदींनी टाईम दर्शन पासेसच्या केंद्रावर धाव घेतली. भाविकांचे होणारे हाल पाहून त्यांनी गर्दी कमी होईपर्यंत टाईम दर्शन सुविधा बंद करून थेट भाविकांना दर्शनरांगेत जाण्याचे आवाहन केले. पासेसची कटकट कमी झाल्याने भाविक आनंदून गेले.दरम्यान संस्थानच्या स्पिकर्सवरून टाईम दर्शन पासेस घेण्याचे आवाहन सुरू असल्याने भाविकांचा गोंधळ उडाला. दरम्यान हे काऊंटर पुन्हा सुरू झाले.ग्रामस्थांनी जावून पुन्हा ते बंद करीत भाविकांना आवाहन केले. उपकार्यकारी संदीप आहेर व पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्याशी चर्चा करून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी टाईम दर्शन काही काळ बंद ठेवण्याची आवश्यकता लक्षात आणून दिली. यावेळी अभी कोते, विकास गोंदकर, नितीन अशोक कोते, राहुल आहेर, प्रसाद बावचे, किरण कोते आदींचीही उपस्थिती होती. यानंतर दर्शन रांगांमध्ये जावून व्यवस्थित रांगा लावण्यात आल्या.दर्शन व्यवस्था सुरळीत झाल्यानंतर सुधाकर शिंदे यांच्या हॉटेलमध्ये ग्रामस्थांची उपकार्यकारी अधिकारी आहेर यांच्या उपस्थितीत बैठक झाली़ या बैठकीला माजी नगराध्यक्ष कैलास कोते, पतिंगराव शेळके, अशोक गोंदकर, प्रमोद गोंदकर, सुजित गोंदकर, नितीन उत्तम कोते, दत्तात्रय कोते आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबा