कोरोनामुळे नवनागापूर ग्रामपंचायतीला लागले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 15:16 IST2020-09-11T15:15:29+5:302020-09-11T15:16:35+5:30
लोकसंख्येच्या दृष्टीने नगर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत आजपर्यंत सुमारे १७५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यात ग्रामपंचायतच्या दोन कर्मचार्यांचाही सहभाग आहे.

कोरोनामुळे नवनागापूर ग्रामपंचायतीला लागले टाळे
नवनागापूर : लोकसंख्येच्या दृष्टीने नगर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायत हद्दीत आजपर्यंत सुमारे १७५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यात ग्रामपंचायतच्या दोन कर्मचार्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीतील इतर सर्व कर्मचार्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालयही काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.
कोरोनाची साखळी रोखण्यासाठी नवनागापूर ग्रामपंचायतीने विविध उपाययोजना राबविल्या असून, याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (दि.१०) गावात कोरोना तपासणी मोहिम राबविण्यात आली. ही मोहिम ऐच्छिक ठेवण्यात आली होती. यात आरोग्य विभागाच्या वतीने ६७ लोकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये दोन ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह ९ जण बाधित आढळून आल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब सप्रे यांनी दिली. कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय सोमवारपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.