कोरोनामुळे जि. प.ची सर्वसाधारण सभा ॲानलाइनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:23 IST2021-02-24T04:23:41+5:302021-02-24T04:23:41+5:30

कोरोनामुळे गेल्या वर्षभर सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष सभागृहात झालेली नाही. मध्यंतरी कोरोना संसर्ग कमी झाल्याने शासनाने सभागृहात बैठका घेण्यास परवानगी ...

Due to Corona, Dist. P.'s general meeting is online only | कोरोनामुळे जि. प.ची सर्वसाधारण सभा ॲानलाइनच

कोरोनामुळे जि. प.ची सर्वसाधारण सभा ॲानलाइनच

कोरोनामुळे गेल्या वर्षभर सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष सभागृहात झालेली नाही. मध्यंतरी कोरोना संसर्ग कमी झाल्याने शासनाने सभागृहात बैठका घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे २६ फेब्रुवारीला होणारी सर्वसाधारण सभा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केली होती; परंतु दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई केली, तसेच सभेला ५० पेक्षा जास्त जणांना उपस्थित राहण्यास निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे २६ ला होणारी सर्वसाधारण सभा पूर्वीप्रमाणेच व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे होणार असल्याचा निर्णय अध्यक्षा राजश्री घुले व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी घेतला. जि.प. सदस्यांनी आपापल्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयातून या सभेत सहभागी व्हावे, असेही या निर्णयात म्हटले आहे.

--------

सदस्यांचा विरोध

ऑनलाइन सभेला काही सदस्यांनी विरोध केला आहे. सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय चर्चेने घेतले जातात. ऑनलाइन सभेत चर्चा करता येत नाही. दुसरीकडे लोकसभा, विधानसभेचे अधिवेशन होतात, मग जिल्हा परिषद सभेलाच अडचण का येते, प्रशासनाने कोरोनाची खबरदारी घेऊन एखाद्या मंगल कार्यालयात सभा आयोजित करावी, अशी मागणी सदस्य शालिनी विखे, राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे आदींनी केली आहे.

Web Title: Due to Corona, Dist. P.'s general meeting is online only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.