उपोषणार्थीला बेदम मारहाण

By Admin | Updated: June 18, 2014 01:21 IST2014-06-18T00:17:35+5:302014-06-18T01:21:42+5:30

पाथर्डी : तालुक्यातील जांभळी गावातील ‘रोहयो’ कामाची चौकशी करावी, या प्रमुख मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले ‘आप’चे तालुका संघटक किसन आव्हाड यांना

Drunken assassination of the preacher | उपोषणार्थीला बेदम मारहाण

उपोषणार्थीला बेदम मारहाण

पाथर्डी : तालुक्यातील जांभळी गावातील ‘रोहयो’ कामाची चौकशी करावी, या प्रमुख मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले ‘आप’चे तालुका संघटक किसन आव्हाड यांना बेदम मारहाण झाल्याची घटना मंगळवारी घडली. या संदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
गैरव्यवहाराची तक्रार
जांभळी येथे सध्या ‘रोहयो’ मार्फत अनेक कामे चालू आहेत. कामात मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार यापूर्वीच आव्हाड यांनी केली आहे. या कामाची चौकशी करावी, या मागणीसाठी आव्हाड यांनी पं. स. समोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. त्यावेळीही आव्हाड व गावातील एक गट समोरासमोर येऊन तणाव निर्माण झाला होता.
कारवाईस विलंब
गेल्या आठवड्यात आव्हाड यांनी गावातील ‘रोहयो’ कामे जेसीबीद्वारे चालू असल्याची तक्रार केल्यावरून नायब तहसीलदार जगदीश गाडे यांनी या कामाची स्वत: जांभळी येथे पाहणी केली होती. पाहणी करूनही संबंधितांवर कारवाई होत नाही, असा आरोप करुन या कामात गैरव्यवहार करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करावा, नायब तहसीलदारांना निलंबित करावे, या मागणीसाठी मंगळवारी आव्हाड प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते.
जखमीची तक्रार
यावेळी प्रांताधिकारी ज्योती कावरे शेवगाव येथे गेल्या होत्या. याचवेळी गावातील एक गट निवेदन देण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात आले. यावेळी मला कार्यालया बाहेर नेऊन मारहाण करण्यात आली. जखमी अवस्थेत मी पळत प्रांताधिकारी कार्यालयात आलो व आतून दरवाजा बंद करुन सुटका करुन घेतली, अशी आव्हाड यांची तक्रार आहे.
जखमीवर उपचार
जखमी आव्हाड यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना तीन टाके पडले असून बरगडीला मार लागला आहे. या घटनेमुळे पाथर्डी प्रांताधिकारी कार्यालयासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
(तालुका प्रतिनिधी)
गुन्हा दाखल करू
हाणामारीची घटना घडली त्यावेळी आपण कार्यालयात नव्हतो. या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर गुन्हा दाखल केला जाईल.
ज्योती कावरे, प्रांताधिकारी

Web Title: Drunken assassination of the preacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.