कोल्हार-घोटी मार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 13:35 IST2019-05-17T13:35:01+5:302019-05-17T13:35:41+5:30
कोल्हार-घोटी राज्यमार्गावर संगमनेर शहराजवळ असलेल्या कासारवाडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.

कोल्हार-घोटी मार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
अहमदनगर : कोल्हार-घोटी राज्यमार्गावर संगमनेर शहराजवळ असलेल्या कासारवाडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
संगमनेर शहराजवळ कासारवाडी शिवारात अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. जोरदार धडक दिल्यानं बिबट्या डाळिंबाच्या बागेत पडला. त्याला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. अलीकडील काळात पुणे-नाशिक आणि कोल्हार-घोटी महामार्गावर वाहनांच्या धडकेमुळे बिबट्यांच्या मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.