दुष्काळातही १३२ पाणी नमुने दूषित

By Admin | Updated: May 8, 2016 23:54 IST2016-05-08T23:46:01+5:302016-05-08T23:54:21+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळस्थिती असतानाही १४ तालुक्यांतील १३२ पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. यात सर्वाधिक अकोले तालुक्यात १९ आणि शेवगाव तालुक्यातील १८ नमुन्यांचा समावेश आहे.

In drought, 132 water samples are contaminated | दुष्काळातही १३२ पाणी नमुने दूषित

दुष्काळातही १३२ पाणी नमुने दूषित

अहमदनगर : जिल्ह्यात दुष्काळस्थिती असतानाही १४ तालुक्यांतील १३२ पिण्याच्या पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. यात सर्वाधिक अकोले तालुक्यात १९ आणि शेवगाव तालुक्यातील १८ नमुन्यांचा समावेश आहे. कर्जत तालुक्यातील एकही पाण्याचा नमुना दूषित आढळून आलेला नाही.
राज्य सरकारने आता प्रत्येक गावातील शुद्ध पाण्याची जबाबदारी संबंधीत ग्रामपंचायतींवर सोपवली आहे. पूर्वी या ठिकाणी पाणी नमुने दूषित आढळून आल्यास त्यास ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाला जबाबदार धरण्यात येत होते. आता दूषित पाण्याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधीत ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आलेली आहे. यासाठी गावागावात जलसुरक्षक नेमण्यात आले असून त्यांच्यामार्फत पाणी स्त्रोतातून पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत.
त्यानंतर हे पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. नगरला मुख्य जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा असून भूजल सर्वेक्षण विभाग यासह राहाता, संगमनेर, कर्जत आणि पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यात येत आहेत.
(प्रतिनिधी)
कर्जत निरंक
नगर ७, अकोले १९, जामखेड ४, कोपरगाव १३, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १३, संगमनेर ८, शेवगाव १८, राहुरी ७, राहाता ३, पाथर्डी १३, पारनेर ९, नेवासा ७ यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कर्जत तालुक्यातील एकही पाणी नमुना दूषित आढळून आला नसल्याचे जिल्हा परिषदेच्या अहवालात नमूद आहे.

Web Title: In drought, 132 water samples are contaminated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.