शहराच्या विस्तारीकरणाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:19 IST2021-02-15T04:19:59+5:302021-02-15T04:19:59+5:30
अहमदनगर : शहरीकरणाच्या विस्तारीत भागासाठी नवीन योजना आणण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवा सुरू आहे. भविष्यात नगर शहराचा विकास झालेला ...

शहराच्या विस्तारीकरणाला चालना
अहमदनगर : शहरीकरणाच्या विस्तारीत भागासाठी नवीन योजना आणण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवा सुरू आहे. भविष्यात नगर शहराचा विकास झालेला पाहायला मिळेल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी येथे केले.
प्रभाग क्रमांक- एकमधील भिस्तबाग चौक ते भिस्तबाग महालापर्यंतच्या रस्त्याच्या बाजूने जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यावेळी जगताप बोलत होते. यावेळी विरोधीपक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका दीपालीताई बारस्कर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, नगरसेवक अविनाश घुले, साहेबराव कसबे, रामदास ढवण, किसन कसबे, सतीश ढवण, राहुल कसबे, गणेश कसबे, कारभारी शेंडे, विजय भोसले, संपत बारस्कर, ॲड. हरिश चंद्रे, जय खरमाळे, सिद्धार्थ काळे, संकेत शिंगटे, रावसाहेब चव्हाण, संजय गाडे, विजय नालकर, विनय पवार, अण्णा जगताप आदी यावेळी उपस्थित होते. जगताप म्हणाले, विकास कामांच्या नियोजनाची खरी गरज असते. शासन दरबारी पाठपुरवा केल्यामुळेच विकासकामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती जगताप यांनी दिली.
...