कारचालकाच्या बेफिकिरीने घेतला युवकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST2021-03-13T04:37:33+5:302021-03-13T04:37:33+5:30

चिचोंडी पाटील : नगर-जामखेड रस्त्यावर भरधाव कारने ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकीस जोराची धडक दिली. टाकळी काझी येथे गुरुवारी सकाळी ...

The driver's negligence took the victim of the youth | कारचालकाच्या बेफिकिरीने घेतला युवकाचा बळी

कारचालकाच्या बेफिकिरीने घेतला युवकाचा बळी

चिचोंडी पाटील : नगर-जामखेड रस्त्यावर भरधाव कारने ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकीस जोराची धडक दिली. टाकळी काझी येथे गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला.

संतोष बाळासाहेब ठोंबरे (२८, रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

संतोष ठोंबरे हा नगर येथील आंनदॠषीजी हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास दुचाकीवरून (एम. एच. १६, टी ८०८९) तो हॉस्पिटलकडे चालला होता. त्याचवेळी कार (एम. एच. ०४ जे. व्ही. १८३१) ही कार भरधाव जामखेडकडून नगरकडे चालली होती. कार ओव्हरटेक करीत असताना संतोषच्या दुचाकीला जोराची धडक दिली आहे. अपघात एवढा भीषण होता की संतोषचा जागीच मृत्यू झाला. कार चालकाच्या बेफिकिरीने त्याचा मृत्यू झाला.

नगर-जामखेड रस्त्याचे नुकतेच नूतनीकरण झाले. त्यामुळे रस्ता व साईडपट्टी नऊ इंच ते एक फूट खटकी पडल्याने दुचाकीस्वारांना डांबरी रस्त्यावरून खाली उतरणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेड काॅन्स्टेबल सचिन वनवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. दुपारी दीडच्या सुमारास चिचोंडी पाटील येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

----

रस्ता नूतनीकरणामुळे वाहन चालक भरधाव वाहने चालवितात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळेच गावाजवळ, गर्दीची ठिकाणी गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्ट्या भरून घेणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.

-अविनाश पवार,

उपसरपंच, टाकळी काझी

Web Title: The driver's negligence took the victim of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.