पिण्यासाठीचे पाणी उकळून, गाळून घ्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:25 IST2021-08-20T04:25:29+5:302021-08-20T04:25:29+5:30
नगराध्यक्षा तांबे यांनी बुधवारी (दि. १८) शहरातील पंपिंग स्टेशन येथे भेट देऊन पाहणी केली. नगरसेवक विश्वास मुर्तडक, नितीन अभंग, ...

पिण्यासाठीचे पाणी उकळून, गाळून घ्यावे
नगराध्यक्षा तांबे यांनी बुधवारी (दि. १८) शहरातील पंपिंग स्टेशन येथे भेट देऊन पाहणी केली. नगरसेवक विश्वास मुर्तडक, नितीन अभंग, बाळासाहेब पवार, किशोर पवार, गजेंद्र अभंग, माजी उपनगराध्यक्ष धनंजय डाके आदी यावेळी उपस्थित होते. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख अभियंता राजश्री मोरे, माधव पावबाके व पंपिंग स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
तांबे म्हणाल्या, भंडारदरा, निळवंडे धरणात पावसाळ्यात पाण्याची नवीन आवक होत आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनद्वारे काही प्रमाणात गढूळ पाणी येऊ शकते. नगरपरिषदेच्या वतीने पाण्यावर आवश्यक प्रक्रिया करत शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. तरीही पावसाळ्यात काही प्रमाणात गढूळ पाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.