व्यापा‌ऱ्याच्या अपहरण प्रकरणी संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:38 IST2021-03-04T04:38:27+5:302021-03-04T04:38:27+5:30

श्रीरामपूर : बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण (वय ५२) या व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी केले ...

Drawing of suspect in kidnapping case of trader issued | व्यापा‌ऱ्याच्या अपहरण प्रकरणी संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी

व्यापा‌ऱ्याच्या अपहरण प्रकरणी संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी

श्रीरामपूर : बेलापूर येथील गौतम झुंबरलाल हिरण (वय ५२) या व्यापाऱ्याच्या अपहरण प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी केले आहे. बेलापुरातील काही सीसीटीव्ही चित्रण तसेच स्थानिकांनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांना आरोपीचा काहीसा मागमूस मिळाला आहे.

या संशयित विषयी काही माहिती असल्यास पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांनी हिरण यांच्या शोधासाठी काही पथके तैनात केली आहेत. बेलापूर बरोबरच श्रीरामपूर शहरातही त्यांनी तपासची चक्रे फिरविली आहेत.

अपहरण केलेल्या व्हॅनचे श्रीरामपुरातून काही सीसीटीव्हीतील चित्रण मिळते का? याचीही पाहणी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी काही लोकांची चौकशी केल्याची माहिती आहे. व्यापारातील काही वादातून हे अपहरण घडले का? त्यादृष्टीने तपास केला जात आहे.

...

आरोपींच्या अटकेची मागणी

दरम्यान, या घटनेवरून ग्रामस्थांमध्ये मोठ्या संतापाचे वातावरण आहे. हिरण यांचा तातडीने शोध घेऊन आरोपींना जेरबंद करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मंगळवारी गावात झालेल्या बैठकीनंतर पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

----------

Web Title: Drawing of suspect in kidnapping case of trader issued