डॉ.वसंत जमधडे यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:27 IST2020-12-30T04:27:25+5:302020-12-30T04:27:25+5:30

श्रीरामपूर : येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.वसंत जमधडे यांची नगर येथे जिल्हा रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकपदी विनंतीवरून ...

Of Dr. Vasant Jamdhade | डॉ.वसंत जमधडे यांची

डॉ.वसंत जमधडे यांची

श्रीरामपूर : येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.वसंत जमधडे यांची नगर येथे जिल्हा रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकपदी विनंतीवरून बदली करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी येथून कार्यमुक्त करत नगर येथे हजर होण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. पी. पोखरणा यांनी हे आदेश पारित केले. जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकपद रिक्त होते. त्यावर डॉ.जमधडे यांची नियुक्ती करण्यात आली. श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाचा कार्यभार डॉ. योगेश बंड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

डॉ.वसंत जमधडे यांची येथील ग्रामीण रुग्णालयातील कारकीर्द यशस्वी ठरली. डॉ.जमधडे यांनी रुग्णालयाचा चेहरामोहरा बदलून टाकला. रुग्णांना उत्कृष्ट सेवा प्रदान केली. त्यामुळे सलग तीन वर्ष रुग्णालयाला कायाकल्प पुरस्कार प्रदान मिळाला. रुग्णालय परिसराच्या स्वच्छतेकडे डॉ.जमधडे यांचे विशेष लक्ष राहिले.

-----------

Web Title: Of Dr. Vasant Jamdhade