डॉ. शिरीष लांडगे, डॉ. संजय दरवडे यांना बढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:23 IST2021-01-16T04:23:23+5:302021-01-16T04:23:23+5:30
भेंडा : नेवासा तालुक्यातील भेंडा येथील मारुतीराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता महाविद्यालयातील डॉ. शिरीष लांडगे, डॉ. संजय दरवडे ...

डॉ. शिरीष लांडगे, डॉ. संजय दरवडे यांना बढती
भेंडा : नेवासा तालुक्यातील भेंडा येथील मारुतीराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता महाविद्यालयातील डॉ. शिरीष लांडगे, डॉ. संजय दरवडे यांना प्राध्यापकपदी बढती मिळाली आहे.
नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकपदाच्या मुलाखती पार पडल्या. त्यामध्ये या दोघांना बढती मिळाली आहे.
अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि सेवाकाळ अशा विविध पातळीवर मूल्यमापन होऊन मुलाखतीद्वारे प्राध्यापकपद मिळते. जिजामाता महाविद्यालयाच्या वाटचालीतील हे पद मिळविणारे महाविद्यालयातील हे दोघे पहिले प्राध्यापक ठरले आहेत.
या दोन्ही प्राध्यापकांच्या यशाबद्दल प्रा. दत्ता वाकचौरे, प्रा. काकासाहेब लांडे, प्राचार्य डॉ. आर. आर. सासवडे, उपप्राचार्य डॉ. रमेश नवल, डॉ. संभाजी काळे आदींसह सर्व सहकाऱ्यांनी कौतुक केले.
फोटो :
१५ शिरीष लांडगे, १५ संजय दरवडे