डॉ. आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST2021-03-15T04:20:43+5:302021-03-15T04:20:43+5:30
शेवगाव : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड सेंटर सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्यासाठी पर्यायी ...

डॉ. आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांची व्यवस्था करा
शेवगाव : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोविड सेंटर सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा व नंतरच सेंटर सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार अर्चना पागिरे यांना विद्यार्थ्यांनी दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात तालुक्याच्या विविध भागांतून शिक्षणासाठी आलेले २० विद्यार्थी सध्या राहात आहेत. दहावी, बारावी परीक्षेदरम्यान आणखी विद्यार्थीसंख्या वाढू शकते. सध्या परीक्षा काळ सुरू असल्याने ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी अभ्यास करीत आहेत. प्रशासनाकडून वसतिगृहात कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. नुकतीच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे. येथे कोविड सेंटर सुरू झाल्यास विद्यार्थ्यांचा निवासाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने कोविड सेंटरसाठी दुसरीकडे जागा घ्यावी किंवा सद्यपरिस्थितीत निवास असलेल्या विद्यार्थ्यांची पर्यायी राहण्याची व्यवस्था करावी, असे निवेदनात म्हटले आहे.