कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा अंत पाहू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST2021-05-01T04:19:40+5:302021-05-01T04:19:40+5:30
कोपरगाव : नाशिक जलसंपदा विभागाने रबी हंगामातील आवर्तनाच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे कांदा व गहू या पिकांना एका ...

कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा अंत पाहू नका
कोपरगाव : नाशिक जलसंपदा विभागाने रबी हंगामातील आवर्तनाच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे कांदा व गहू या पिकांना एका पाण्याची गरज असताना ते वेळेवर मिळाले नाही, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. आवर्तनाबाबत लोकप्रतिनिधींनी नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र, शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण पाण्याच्या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे, तसेच जलसंपदा खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे.
कोल्हे म्हणाल्या, मागील वर्षी चांगला पाऊस झाला. धरणेही पूर्ण क्षमतेने भरलेली असल्याने शेतकरी बांधवांनी उसाची व फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती. पाटबंधारे खात्याकडून उन्हाळ्यात किमान तीन आवर्तने मिळतीलच अशी अपेक्षा शेतकरी बांधवांना होती. एप्रिल महिना सुरू होऊनदेखील आवर्तनाच्या तारखा पाटबंधारे विभागाने जाहीर केलेल्या नाहीत. विहिरीच्या पाण्याने तळ गाठला, तसेच उष्णतेचे प्रमाण वाढल्याने सध्या पिकांनादेखील पाण्याची खूपच गरज आहे. उभे पीक हे डोळ्यासमोर जळत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे. १५ एप्रिलला उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. आवर्तन सोडून १५ दिवस झाले तरी शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही पाणी पोहोचलेले नाही. सर्वांना कालव्याच्या माध्यमातून दिसत असलेले पाणी मुरते तरी कुठे? याचा शोध घेणे गरजेचे आहे.