केवळ फोटो सेशनसाठी झाडे लावू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:19 IST2021-03-07T04:19:03+5:302021-03-07T04:19:03+5:30

जामखेड : लावलेले झाड वाया जाणार नाही यासाठी प्लॅन तयार आहे. केवळ फोटो सेशनसाठी झाडे लावू नयेत. किती झाडे ...

Don't plant trees just for the photo session | केवळ फोटो सेशनसाठी झाडे लावू नका

केवळ फोटो सेशनसाठी झाडे लावू नका

जामखेड : लावलेले झाड वाया जाणार नाही यासाठी प्लॅन तयार आहे. केवळ फोटो सेशनसाठी झाडे लावू नयेत. किती झाडे जगली यासाठी रजिस्टर केले असून, कोणी काय केले याचे मूल्यमापन केले जाणार आहे. झाडे जगली तर शहर हरित होईल, असा असे प्रतिपादन बारामती ॲग्रोचे सुनंदा पवार यांनी केले.

बारामती ॲग्रोच्या वतीने हैदराबाद येथून आणलेली विविध प्रकारची साडेपाच हजार झाडे नगर परिषदेला सपुर्द करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. सुरुवातीला स्वच्छता अभियानास अल्पप्रतिसाद मिळाला. मात्र नगर परिषद निवडणूक हालचाल होताच इच्छुकांनी पुढाकार घेत कार्यकर्त्यांसह सहभाग घेऊन प्रभाग स्वच्छ करण्यासाठी पावले टाकली आहेत.

मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते म्हणाले, २२ हजार झाडे लावण्याचा प्लॅन केला आहे. प्रत्येक झाडाला लोखंडी जाळी बसविली जाणार असून, नगर परिषदेच्या दोन टँकरने पाणी दिले जाणार आहे. शहरातील नागरिकांना पालिकेने झाडे देण्याचे आवाहन केले होते. यासाठी काही नागरिकांनी वाढदिवसाचे औचित्य साधून वनौषधीची झाडे दिली. मात्र ते प्रमाण अत्यल्प होते, असे त्यांनी सांगितले.

--

०६ जामखेड पवार

सुनंदा पवार यांनी साडेपाच हजार झाडे जामखेड नगर परिषदेकडे सुपुर्द केली.

Web Title: Don't plant trees just for the photo session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.