अकोले-संगमनेर वादाची चुकीची प्रथा पाडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:21 IST2021-04-24T04:21:06+5:302021-04-24T04:21:06+5:30
पिचड म्हणाले, अकोले तालुक्यात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने अकोलेचे कोरोना रुग्ण संगमनेरात ॲडमिट होत आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि ...

अकोले-संगमनेर वादाची चुकीची प्रथा पाडू नका
पिचड म्हणाले, अकोले तालुक्यात पुरेशा आरोग्य सुविधा नसल्याने अकोलेचे कोरोना रुग्ण संगमनेरात ॲडमिट होत आहेत. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अकोले तालुक्यासाठी मोठे योगदान आहे. जनतेने ज्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे, तेच एकमेकांबरोबर भांडत बसले असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कोरोनाचे राजकारण करू नका. जनतेला मदतीचा हात द्या. अकोलेतील स्थिती गंभीर असून रुग्णांना बेड मिळत नाही. ऑक्सिजन नाही, रेमडेसिविरसाठी रुग्णांचे नातेवाईक वणवण भटकत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे.
या संकटात तालुक्यातील प्रत्येक माणसाने या महामारीत प्रत्येकाला मदत करा. कोरोनाग्रस्तांकडे अमानवी वृत्तीने पाहू नका. सर्वांनी नियमांचे पालन करून कोरोनाचे दुसरे संकट परतवून लावा.
चाळीस वर्षांपूर्वीच्या अकोल्याच्या आदिवासी भागात एखादा माणूस आजारी पडला, तर त्याला डोली करून न्यावे लागत होते. दळणवळणाची सुविधा नव्हती. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती, पण अकोलेची जनता माझ्याबरोबर होती. आयुष्यभर संघर्ष आपल्या वाट्याला आला. परिणामांची चिंता न करता लोकांसाठी काम करीत राहिलो. तालुक्यात चार मोठी ग्रामीण रुग्णालये, १० प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८० आरोग्य उपकेंद्रे निर्माण केली.
आयुष्यभर संघर्ष आपल्या वाट्याला आला. परिणामांची चिंता न करता लोकांसाठी काम करीत राहिलो. आजही वयाच्या ८० व्या वर्षी लोकांसाठी काम करण्याची ऊर्मी ही लोकांमुळेच आपल्याला मिळते. परक्यांबरोबरच स्वकीयांनीही आपल्याला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला, पण आपण कधीही डगमगलो नाही, घाबरलो नाही. आजही वयाच्या ८० व्या वर्षी लोकांसाठी काम करण्याची ऊर्मी ही लोकांमुळेच आपल्याला मिळते.
..............
आम्ही कधीही एकमेकांशी भांडलो नाही
थोरात यांच्यामुळे निळवंडे धरणाचे व कालव्याचे काम मार्गी लागले आहे. अगस्ती कारखान्यास संगमनेरने ना-हरकत प्रमाणपत्र दिले नसते, तर अगस्ती कारखाना उभा राहिला नसता. त्यामुळे अकोले-संगमनेर असा दुजाभाव करू नका, असे पिचड यांनी सांगितले.