बोटा कोविड केअर सेंटरला ११ हजार रुपयांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST2021-05-28T04:16:17+5:302021-05-28T04:16:17+5:30
संगमनेर तालुक्यातील बोटा गटात कोविड रुग्णांची परिस्थिती लक्षात घेऊन कॉंग्रेसचे गटनेते, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे व येथील ग्रामस्थांनी ...

बोटा कोविड केअर सेंटरला ११ हजार रुपयांची मदत
संगमनेर तालुक्यातील बोटा गटात कोविड रुग्णांची परिस्थिती लक्षात घेऊन कॉंग्रेसचे गटनेते, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे व येथील ग्रामस्थांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे, इंद्रजित थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे पाठपुरावा करून एप्रिल महिन्यात कोविड केअर सेंटर सुरू केले. लोकसहभाग व प्रशासनाच्या समन्वयातून सुरू असलेल्या बोटा कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना सकाळी नाश्ता, दोनवेळा चहा, जेवण, बेड, बाटलीबंद पिण्याचे पाण्यासह अनेक सुविधा दिल्या जात आहेत. या कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरूच असून, अकलापूर येथील दत्तमंदिर ट्रस्टने आपला सहभाग नोंदवत गुरुवारी सकाळी ११ हजार रुपयांचा धनादेश कॉंग्रेसचे गटनेते व जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या हस्ते कोविड सेंटरला दिला.
यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे संपत आभाळे, शिवाजी तळेकर, वसंत आभाळे, प्रताप तळेकर, दत्तात्रय आभाळे, गणेश आभाळे यांसह संदीप आहेर, गणेश लेंडे, नवनाथ आहेर, बंटी लेंडे उपस्थित होते.