मानधना ट्रस्टतर्फे राम मंदिरासाठी देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:19 IST2021-01-18T04:19:39+5:302021-01-18T04:19:39+5:30

यावेळी मानधना म्हणाले, गोविंदगिरी महाराज आमच्या परिवाराचे श्रद्धास्थान आहेत. अयोध्येत रामाचे मंदिर उभारणीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या न्यासात गोविंदगिरीजी यांचा ...

Donation for Ram Mandir by Manadhana Trust | मानधना ट्रस्टतर्फे राम मंदिरासाठी देणगी

मानधना ट्रस्टतर्फे राम मंदिरासाठी देणगी

यावेळी मानधना म्हणाले, गोविंदगिरी महाराज आमच्या परिवाराचे श्रद्धास्थान आहेत. अयोध्येत रामाचे मंदिर उभारणीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या न्यासात गोविंदगिरीजी यांचा सहभाग ही अभिमानास्पद गोष्ट आहे. कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न मंदिर उभारणीमुळे साकार होत आहे. यासाठी खारीचा वाटा देता आला ही आमच्या परिवारासाठी भाग्याची गोष्ट आहे.

गोविंदगिरीजी महाराज म्हणाले, अयोध्येत राम मंदिर उभारण्यात येत असून एक हजार वर्षे मजबूत राहील, असा आराखडा करण्यात आला आहे. मंदिर निर्मितीत प्रत्येक भाविकाला योगदान देता यावे यासाठी निधी समर्पण अभियान सुरू आहे. नगरमध्ये धर्मप्रेमी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. नगरमधून या ऐतिहासिक कार्यास मोठा हातभार लागेल, असा पूर्ण विश्वास आहे.

--

फोटो- १७ श्री. राम मंदिर ट्रस्ट

राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांना नगर येथील उद्योजक मोहनलाल मानधना यांनी देणगीचा धनादेश सुपूर्द केला.

(वा. प्र. )

Web Title: Donation for Ram Mandir by Manadhana Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.