पारनेर तालुक्यात कुत्र्याचा धुमाकूळ : पंचवीस जणांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:24 IST2019-01-03T16:24:21+5:302019-01-03T16:24:36+5:30
पारनेर तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्याने कालपासून धुमाकूळ घातला असून २० ते २५ जणांना चावा घेतला आहे.

पारनेर तालुक्यात कुत्र्याचा धुमाकूळ : पंचवीस जणांना चावा
निघोज : पारनेर तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्याने कालपासून धुमाकूळ घातला असून २० ते २५ जणांना चावा घेतला आहे. तालुक्यातील निघोज, देवीभोयरे, वडगाव गुंड गावातील नागरिकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. यात सुमारे वीस ते पंचवीस जण जखमी झाले असून यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. काही जखमींना १०८ रुग्णवाहिका मधील वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र मुळे यांनी उपचार केले.